
Metro 3
ESakal
मुंबई : आरे-कफ परेड मेट्रो-३ भुयारी मेट्रो सेवा सुरू झाल्याने मुंबईकरांना गारेगार आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाची पर्वणी मिळाली आहे. मात्र तासाभराच्या या प्रवासात प्रवासी पुरते नॉट रीचेबल होत आहेत. सदरच्या भुयारी मेट्रो मार्गिकेवर मोबाईलला नेटवर्कच मिळत नसल्याने प्रवाशांना स्थानकात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत ना कोणाचा फोन येतो, ना व्हाट्सएपवर मेसेज येतो. त्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.