आरोग्य सेतू बंधनकारक, विशेष विद्यार्थ्यांना N95 मास्कची सक्ती; CET च्या विद्यार्थ्यांना अटी पूर्ण करण्याचे टेन्शन

तेजस वाघमारे
Wednesday, 28 October 2020

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे.

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसोबतच परीक्षेला जाताना अटी पूर्ण करण्याचे टेन्शन आले आहे. मोबाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेतू ऍपची सक्ती करण्यात आली असून लेखनिकची सुविधा घेणाऱ्या विशेष विद्यार्थ्यांना एन 95 मास्कची बंधनकारक करण्यात आला आहे. या अटींची पूर्तता न केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे, सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

कोरोनामुळे लांबणीवर गेलेली तीन वर्ष कालावधीची विधी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 2 आणि 3 नोव्हेंबरला आयोजित केली आहे. तसेच  बीपीएड परीक्षा 4 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सीईटी सेलने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी अनेक अटी घातल्या आहेत. त्या पूर्ण करताना विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे.

महत्त्वाची बातमी : दिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज एक हजार जादा फेऱ्या; परिवहन मंत्र्यांची माहिती

परीक्षा केंद्रावर पोहचताच मोबाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेतू ऍपमध्ये विभागाची सद्यस्थिती दाखवावी लागणार आहे. यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर, पारदर्शक पाणी बाटली आदी सुरक्षा साधने बंधनकारक आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांना हॉलतिकीटसोबत पाठवलेला अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

तर अंध, अपंग विद्यार्थ्यांने लेखनिकाची मदत घेतली असल्यास अशा विद्यार्थ्यांना एन 95 मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच लेखनिकालाही N95 मास्क परिधान करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यास कोरोनाशी संबंधीत लक्षणे असल्यास अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही. यासह अनेक अटी विद्यार्थ्यांना पूर्ण करावा लागणार असल्याने परीक्षेपेक्षा स्वत:ची काळजी घेण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

महत्त्वाची बातमी : तारिक गार्डन दुर्घटनेचा तपास संथगतीने, न्याय कधी मिळणार रहिवाशांचा सवाल

aarogya setu app mandatory special kids need N95 students are taking tension of CET exams


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aarogya setu app mandatory special kids need N95 students are taking tension of CET exams