दिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज एक हजार जादा फेऱ्या; परिवहन मंत्र्यांची माहिती

प्रशांत कांबळे
Wednesday, 28 October 2020

दिवाळीमधील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने राज्यात 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे एक हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

मुंबई : दिवाळीमधील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने राज्यात 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे एक हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असून, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री डॉ. अनिल परब यांनी दिली. 

विधानपरिषदेवर राज्यपाल कोणाची नेमणूक करणार? महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी

आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. एसटीमार्फत दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी नियमित बस फेऱ्या व्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी एसटी महामंडळाने या जादा बस फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

'हिंदुत्व समजून घेण्याची ठाकरेंची बौद्धिक कुवत नाही'; भाजप अध्यात्मिक आघाडीची टीका

 राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी आवश्‍यक त्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश मुख्यालयातून एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One thousand extra rounds of ST daily for Diwali; Information of Transport Minister