आर्याप्रहरचे वनौषधी परिचय शिबीर संपन्न

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मुंबई : पनवेल येथील सुप्रसिद्ध आर्या प्रहर संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनी भरपावसात वृक्षापण करण्यात आले.

मुंबई : पनवेल येथील सुप्रसिद्ध आर्या प्रहर संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनी भरपावसात वृक्षापण करण्यात आले.

मधुमेह तपासणी, वृक्ष वाटप, वृक्ष लागवड अशा भरगच्च कार्यक्रमांनी आर्या प्रहर संस्थेचा पाचवा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वनौषधी प्रेमींचे आवडती संस्थाअसलेल्या आर्या प्रहरच्या वर्धापनदिनी गुडमार, बेल, रुद्राक्ष, केवडा, लाल चंदन, अर्जून, पांढरा चंदन, सर्पगंधा, विजयसार, टेंटू, विधारा, मेढशिंगी, सीतेचे अशोक आदी वनौषधी रोपांचे वाटप व लागवड करण्यात आली. या वेळी आर्या वनौषधी संस्थेचे राजेश संखे, शशिकांत म्हात्रे,संदीप शंभरकर, प्रिती साबळे, आर्या पाटील, प्रतिक्षा म्हात्रे, दत्तू कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.  अल्पावधीतच हजारो वनौषधी प्रेमींच्या ह्रदयात स्थान मिळवणाऱ्या आर्या प्रहरच्या वर्धापनदिनी मोर्बे (पनवेल) येथे वनौषधी परिचय शिबीर घेण्यात आले. या शिबिरात रायगड जिल्ह्यातील अनेक वनौषधी प्रेमी सहभागी झाले होते. 

सदर शिबिरात आर्या प्रहरचे संचालक व आर्या वनौषधी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी अर्जून, विजयसार, गुडूची, मुंडी, विभितक, सारिवा, कुटज, अग्निशिखा, कांचनार, शिवलिंगी, ढाक, पांढरे चित्रक, कोशिंब, गंभारी, भल्लातक, मेंढशिंगी, अमरवेल, बकायन, पूत्रजिवी आदी १०० पेक्षाही अधिक आयुर्वेदीक वनस्पतींची ओळख व औषधी गुणधर्मांची माहिती दिली. वर्धापनदिनी मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली .

Web Title: aaryaprahar's Herbal Introduction Camp