शताब्दी रुग्णालयातील प्लाझ्मा केंद्र कागदावरच; इमारतीच्या पेचामुळे रखडपट्टी

समीर सुर्वे
Sunday, 29 November 2020

गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात होणारे प्लाझ्मा फ्रॅक्‍शनेशन केंद्र सहा वर्षांपासून कागदावरच आहे. आता किमान पुढील दोन वर्षे तरी ते सुरू होण्याची शक्‍यता नाही. दरम्यानच्या काळात जुन्या इमारतीत केंद्र सुरू करणे अथवा नवी इमारत उभारण्याबाबत निर्णय झालेला नाही. या पेचामुळे केंद्रच रखडले आहे.

मुंबई : गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात होणारे प्लाझ्मा फ्रॅक्‍शनेशन केंद्र सहा वर्षांपासून कागदावरच आहे. आता किमान पुढील दोन वर्षे तरी ते सुरू होण्याची शक्‍यता नाही. दरम्यानच्या काळात जुन्या इमारतीत केंद्र सुरू करणे अथवा नवी इमारत उभारण्याबाबत निर्णय झालेला नाही. या पेचामुळे केंद्रच रखडले आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

रक्तद्रव्ये (प्लाझ्मा) तसेच इतर घटक वेगळे करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळेची आवश्‍यकता आहे. असे केंद्र गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालविया शताब्दी रुग्णालयात सुरू करण्याचा निर्णय 2014 मध्ये महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, अद्याप ते सुरू झालेले नाही. नोव्हेंबरच्या सुरुवातीला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शताब्दी रुग्णालयाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली. त्या चर्चेवर प्रशासनाने या आठवड्यात स्थायी समितीपुढे माहिती मांडली आहे. 

वेगवान सेवेसाठी 'अदानी'चा डिजिटलवर भर; ग्राहकांना गुगल असिस्टंट, स्मार्ट वीजमीटर मिळणार

सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी केईएम रुग्णालयातील प्लाझ्मा फ्रॅक्‍शनेशन युनिट शताब्दी रुग्णालयात स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ते शताब्दी रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या प्रस्तावित इमारतीत हे केंद्र स्थलांतरित करण्यात येणार आहे ती 35 वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती पाडून नवी इमारत उभारावी, असा अहवाल सल्लागाराने दिला आहे. आहे त्या इमारतीत केंद्र सुरू करावे का नवी इमारत बांधावी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर बांधकाम कंत्राटदार आणि यंत्राच्या खरेदीसाठी निविदा सादर केल्या जातील, असे महापालिकेने स्थायी समितीला सादर केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. 

विना मास्क फिराल, तर घ्यावा लागेल 200 रुपयांचा मास्क; मुंबई महापालिकेची गांधीगिरी!

काय आहे प्लाझ्मा फ्रॅक्‍शनेशन सेंटर? 
रक्ताबरोबरच रक्तातील द्रव्ये, रक्तपेशी आणि पांढऱ्या पेशी (प्लेटलेट) वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जातात. भारतात प्लाझ्मा फ्रॅक्‍शनेशन केंद्राची संख्या अपुरी असल्याने अनेक वेळा रक्त वाया जाते. दुसऱ्या बाजूला रक्तद्रव्ये, रक्तपेशी आणि पांढऱ्या पेशींची कमतरता असते. फ्रॅक्‍शनेशन केंद्रात रक्तातील घटक वेगळे केले जातात. 

----------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The plasma center at Shatabdi Hospital is on paper; Rumble due to building cracks