माजी न्या. ठिपसेंचे कॉंग्रेसकडून स्वागत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी आज गांधीभवन येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. गांधीभवन या प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यालयात माजी न्यायमूर्ती ठिपसे यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा अर्ज भरून कॉंग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ठिपसे यांना कॉंग्रेस सदस्यत्वाची पावती व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी खा. कुमार केतकर, माजी मंत्री वसंत पुरके, आ. अमर राजूरकर, आ. रामहरी रूपनवर, आ. अमित झनक, आ. डी. एस. अहिरे, माजी आ. मोहन जोशी, आनंदराव गेडाम, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह अनेक कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: abhay thipsay congress entry politics