

Abhijit Tharwal has been given BJP nomination
ESakal
डोंबिवली : शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत थरवळ यांचा भाजपात प्रवेश झाला होता. मित्र पक्षातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रवेशावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः समाज माध्यमावर पोस्ट करत या प्रवेशाला स्थगिती दिली होती. मात्र धुमधडाक्यात प्रवेश न करता मागच्या दारातून भाजपने केवळ उमेदवारी जाहीर केली नाही, तर एबी फॉर्म सुद्धा दिला आहे. थरवळ यांनी स्वतः ही माहिती समाज माध्यमावर व्हायरल केली आहे.