Abhishek Ghosalkar Death: दहिसरमधील गोळीबारात ठाकरे गटाच्या घोसाळकरांचा मृत्यू; काय होते त्यांचे अखेरचे शब्द ?

Sena (UBT) leader Abhishek Ghosalkar shot dead during Facebook live: मॉरिस भाई याने आधी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केले त्यानंतर ५ गोळ्या फायर केल्या.
Abhishek Ghosalkar Death
Abhishek Ghosalkar Deathesakal

Abhishek Ghosalkar Death: दहिसर परिसर आज गोळीबाराने हादरला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर गोळ्या झाडणारा मॉरिस भाई याने देखील स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिस उपआयुक्त राजतिलक रोशन यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने अद्याप कन्फर्म केलं नाही.

गोळीबाराचा थरार फेसबुक लाईव्हमध्ये दिसला आहे. आपआपसातील वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अभिषेक घोसाळकर यांना पाच गोळ्या लागल्या होत्या. 

Abhishek Ghosalkar Death
Abhishek Ghosalkar Firing: ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर दहिसरमध्ये गोळीबार, लाईव्ह व्हिडिओ दरम्यान झाडल्या गोळ्या Video

मॉरिस भाई याने आधी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केले त्यानंतर ५ गोळ्या फायर केल्या. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. तर आरोपी मॉरिसभाने स्वत:वर देखील गोळ्या झाडत आत्महत्या केली.

गोळीबाराचा धक्कादायत व्हिडिओ फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाला आहे. मॉरिसने घोसाळकरवर ५ गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या पोटात लागली. पैशाच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Abhishek Ghosalkar Death
Abhishek Ghosalkar Firing: अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हाचा मृत्यू; कोण आहे मॉरिसभाई?

गॉड ब्लेस यू...

दहिसरच्या मॉरीसभाई याच्या कार्यालयात ही घटना घडली तिथले सिसिटीव्ही फुजेट समोर आले आहे. या फुटेजमध्ये आरोपी मॉरीस यांच्या कार्यालयात मॉरीस नोरोन्हा आणि अभिषेक घोसाळकर हे दोघेही इंग्रजीत एकमेकांसोबत चर्चा करत आहे. फेसबुकवरुन हा सर्व संवाद लाईव्ह होते. या संवादातून दोघांमधील मतभेद दूर झाले आहे. आता आम्ही सोबत काम करणार असल्याचे अभिषेक घोसाळकर सांगत आहेत.

जनतेसाठी आम्ही सोबत मिळून चांगले काम करु असे ते सांगतात.त्यानंतर अभिषेक सोफ्यातून उठून जात असताना अचानक अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. पहिली गोळी अभिषेक यांच्या छातीत लागली असून, दुसरी पोटात गोळी लागली आहे.त्यानंतर ते खाली कोसळतांनी दिसतात.या फुटेजमध्ये एकुण पाच गोळ्या झाडल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकु येतो.

कोण आहे अभिषेक घोसाळकर (who is Abhishek Ghosalkar)

- शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे निष्ठावंत

- वडील विनोद घोसाळकर हे २००९,२०१४ मध्ये आमदार होते.

- अभिषेक घोसाळकर हे दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

- तरुण अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून प्रतिमा

- दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर ७ चे नगरसेवक होते

- मुंबै बँकेचे संचालक

कोण आहे मॉरीस (who is Maurris Bhai)

मॉरीस हा स्वताला समाजसेवक म्हणवून घेतो. बोरीवलीत राहणाऱ्या मॉरीसला मॉरीसभाई या नावाने ओळखले जाते. लॉकडाऊन काळात मॉरीसने हजारोंना रेशन वाटल्याचे काम केल्याच्या काही बातम्या वेबसाईटवर आल्या आहेत. या काळात जनजागृतीसाठी बोरीवली ते वांद्रे इथे मॉरीसने पदयात्रा केल्याचे वेबसाईटच्या बातम्यांवरुन कळते. खान यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगीतले जाते. अभिषेक घोसाळकर यांची नुकतीच मॉरीस सोबत परिचय झाला होता.दोघामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. मात्र हा वाद नेमका काय होता, ते अजून स्पष्ट होत नाही.

महाराष्ट्रात काय चालले आहे?

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही. रात्री अभिषेकवर गोळीबार झाला. अशीच परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

तर राज्य गुंडांच्या तावडीत आहे.म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत असा दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय..आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशी मागणी देखील त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com