Abhishek Ghosalkar Firing: ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर दहिसरमध्ये गोळीबार, FB लाईव्ह दरम्यान झाडल्या गोळ्या Video Viral

Uddhav faction leader Abhishek Ghosalkar shot dead during Facebook live, shooter kills self: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अभिषेक यांच्यावर करुणा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Abhishek Ghosalkar Firing
Abhishek Ghosalkar Firingesakal

Abhishek Ghosalkar Firing: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अभिषेक यांच्यावर करुणा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत.  (Who Is Abhishek Ghosalkar)

राज्यात गोळीबारांच्या घटनेत वाढ झाली आहे. अभिषेक घोसाळकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. ठाकरे गटात असलेले विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोळीबार का केला? याची माहिती अद्याप मिळाली नाही. पोलिसांना तपास पथचे तैनाक केली आहेत. (Abhishek Ghosalkar Firing)

Abhishek Ghosalkar Firing
Baba Siddique: शाहरुखचं मत महायुतीला? शेलारांच्या मतदारसंघातले सिद्दीकी पक्षात आल्याने राष्ट्रवादीला काय फायदा?

मात्र दहिसरमध्ये गोळीबार झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. (Latest Marathi News)

कुणी केला गोळीबार-

मॉरिसभाई नाव्याच्या व्यक्तिने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. मॉरिसभाईने स्वत:ला सुद्धा ४ गोळ्या मारुन घेतल्याची माहिती मिळत आहेत. आपआपसातल्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

यापूर्वी उल्हासनगर येथे पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. (Crime News)

गॉड ब्लेस यू...

दहिसरच्या मॉरीसभाई याच्या कार्यालयात ही घटना घडली तिथले सिसिटीव्ही फुजेट समोर आले आहे. या फुटेजमध्ये आरोपी मॉरीस यांच्या कार्यालयात मॉरीस नोरोन्हा आणि अभिषेक घोसाळकर हे दोघेही इंग्रजीत एकमेकांसोबत चर्चा करत आहे. फेसबुकवरुन हा सर्व संवाद लाईव्ह होते. या संवादातून दोघांमधील मतभेद दूर झाले आहे. आता आम्ही सोबत काम करणार असल्याचे अभिषेक घोसाळकर सांगत आहेत.

जनतेसाठी आम्ही सोबत मिळून चांगले काम करु असे ते सांगतात.त्यानंतर अभिषेक सोफ्यातून उठून जात असताना अचानक अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. पहिली गोळी अभिषेक यांच्या छातीत लागली असून, दुसरी पोटात गोळी लागली आहे.त्यानंतर ते खाली कोसळतांनी दिसतात.या फुटेजमध्ये एकुण पाच गोळ्या झाडल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकु येतो.

कोण आहे अभिषेक घोसाळकर -

- शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे निष्ठावंत

- वडील विनोद घोसाळकर हे २००९,२०१४ मध्ये आमदार होते.

- अभिषेक घोसाळकर हे दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

- तरुण अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून प्रतिमा

- दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर ७ चे नगरसेवक होते

- मुंबै बँकेचे संचालक

शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. ५ वाजता मातोश्रीवर ते बैठक करुन गेले होते.लोकांमधील कायद्याची भितीच निघून गेली आहे.

-आदित्य ठाकरे, उबाठा नेते

Abhishek Ghosalkar Firing
School Time Change: राज्यातील प्राथमिक शाळांचा वेळ बदलणार; राज्य सरकारने काढला जी आर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com