

Abu Azmi and Rais Sheikh political fight
ESakal
पंढरीनाथ कुंभार
भिवंडी : मुस्लिमबहुल भिवंडी शहरातील अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाखाली सत्तासंघर्ष पेटला आहे. आगामी भिवंडी महापालिका निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आमदार रईस शेख आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात आपसातील स्पर्धा चांगलीच रंगली आहे. या राजकीय संघर्षात कोणी धर्म आणि धार्मिक भावना पुढे करीत आहे, तर कोणी वंदे मातरमला विरोध दर्शवून आपली धार्मिक निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.