अबू जुंदालच्या खटल्याला स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे.

मुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहा दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिल्याचा जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदालवर आरोप आहे. शिवाय हल्ल्याच्या वेळेस पाकिस्तानमधील नियंत्रण कक्षातून त्याने दहाही दहशतवाद्यांना सूचना दिल्या होत्या, असाही त्याच्यावर आरोप आहे. सत्र न्यायालयात जुंदालच्या विरोधात खटला सुरू आहे. पोलिसांनी त्याला सौदी अरेबियामधून अटक केली होती. त्या वेळेस त्याच्याकडे असलेली कागदपत्रे आणि पारपत्रे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. ही कागदपत्रे बोगस असून, ती मिळण्याची मागणी जुंदालच्या वतीने न्यायालयात करण्यात आली आहे. या मागणीला न्यायालयाने परवानगी दिली आहे, तर याविरोधात आता दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. अशाप्रकारे खटल्यातील कागदपत्रे आरोपीला देता येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. न्यायालयाने तूर्तास खटल्याच्या कार्यवाहीला स्थगिती दिली असून, पुढील सुनावणी 11 जूनला होणार आहे.

Web Title: abu jundal case stop high court