अबू सालेम, डोसाचा 29 मे रोजी निकाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई - मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉंबस्फोट प्रकरणाचा दुसरा टप्पा अर्थात "केस बी'चा निकाल 29 मे रोजी जाहीर होणार आहे. यातील सात आरोपी दोषी आहेत की नाहीत, याबाबत मुंबईतील विशेष टाडा न्यायालय निकाल जाहीर करील.

गुंड अबू सालेम याच्यासह मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहेर मर्चंट, रियाझ सिद्दिकी, करीमुल्ला शेख आणि अब्दुल कय्यूम शेख यांच्यावरील आरोप निश्‍चित झाले आहेत. सात आरोपींमध्ये पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करारावर भारताकडे हस्तांतर केलेला आरोपी अबू सालेम, दुबईहून अटक केलेला आरोपी मुस्तफा डोसा प्रमुख आरोपी आहेत. सध्या मुस्तफा डोसा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आणि अबू सालेम नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात आहेत.

Web Title: abu salem, dosa 29 may result

टॅग्स