आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी

अनिश पाटील
Monday, 30 November 2020

आरे येथील जंगलात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने  मुलीला पोलिसात गेल्यास सोशल मिडियावर तिचे अश्लील फोटो टाकून जिवे मारण्याची ही धमकी दिली

मुंबई  - आरे येथील जंगलात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने  मुलीला पोलिसात गेल्यास सोशल मिडियावर तिचे अश्लील फोटो टाकून जिवे मारण्याची ही धमकी दिली. या प्रकरणी आरे पोलिसांनी एका 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा - भाईंदरमध्ये राजकीय बदलाचे संकेत; भाजपमधून राष्ट्रवादीत इनकमिंग वाढणार

मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात पीडित मुलगी आणि आरोपी दोघंही शेजारी शेजारी राहतात. 8  नोव्हेंबरला आरोपीने पीडित मुलीला फोन करून मित्राच्या एका प्रेमप्रकरणा विषयी बोलायचे असल्याचे सांगून पीडित मुलीला बोलावून घेतले. त्यानुसार पीडित मुलगी आरे कॉलनीतील बीएमसी शाळेजवळ आली. वेळ सायंकाळची असल्यामुळे अंधार होत होता. याच होणाऱ्या अंधाराचा फायदा घेऊन  त्याने पीडितेवर जबदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी निर्जनस्थळी असल्यामुळे तिची हाक बहुदा कोणापर्यंत पोहचली नाही. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडितेला त्रास देण्याच्या हेतून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. घडलेल्या घटनेनंतर पोलिसात गेल्यास अश्लील फोटो सोशल मिडियावर टाकण्याची धमकी आरोपीने तिला दिली होती.  

हेही वाचा - रायगडच्या जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट तब्बल सात वर्षांनंतर सुरू; सामाजिक संस्थांचा पाठपुरावा

त्यानंतर आरोपी वारंवार मुलीला ब्लॅकमेल करत होता. रोजच्या या त्रासाला कंटाळून आरे कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 376, 354(ब), 506(ब), भा.द.वि कलमांसह 4,8,12 पोस्कोसह 67आयटी अँक्ट अंतरर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

abuse of a minor girl in Aarey forest Threats to defame on social media

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abuse of a minor girl in Aarey forest Threats to defame on social media