AC Local : एसी लोकलचे प्रवासी दुप्पट! तीन महिन्यात एसी लोकलमध्ये ९ हजार फुकटे प्रवासी

गेल्या तीन महिन्यात मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमधून ४९.४७ लाख प्रवाशांनी गारेगार आल्हाददायक प्रवास केला आहे.
AC Local
AC LocalSakal

मुंबई - गेल्या तीन महिन्यात मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमधून ४९.४७ लाख प्रवाशांनी गारेगार आल्हाददायक प्रवास केला आहे. ज्यातून मध्य रेल्वेला २३.३६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत नऊ हजार ५९३ फुकट्यांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे.

मध्य रेल्वेवर सध्या दिवसाला चार एसी लोकल गाड्यांचा ५६ फेऱ्या चालविण्यात येतात. या फेऱ्या सीएसएमटी-ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा दरम्यान धावतात. सध्या या लोकलमधून दररोज ५० हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

भारतीय रेल्वेने ५ मे २०२२ रोजीपासून एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केली. त्यानंतर एसी लोकलची प्रवासी संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विशेष म्हणजे एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत एसी लोकलमधून ४९.४७ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून २३.३६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

गेल्या वर्षी याच्या कालावधीत एप्रिल ते जून २०२२ मध्ये एसी लोकलमधून २६.६० लाख प्रवाशांनी प्रवास केला असून १२.१६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा यंदा एसी लोकलच्या प्रवाशांमध्ये आणि महसुलामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.

एसी लोकलमध्ये ९ हजार फुकटे प्रवासी

साध्या लोकलमधील जीवघेणा प्रवास आणि गर्टी टाळण्यासाठी मुंबईकरांनी एसी लोकलकडे आपला मोर्चा वळविला आहे. खासकरुन सकाळी आणि संध्याकाळच्या पीक अवरच्या वेळी एसी लोकलला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेउन विना तिकिट प्रवासी देखील एसी लोकलमधून प्रवास करीत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विना तिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मध्य रेल्वेने एप्रिल २०२३ ते जून २०२३ पर्यत ९ हजार ५९३ फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३१.९२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहेत.

तीन महिन्याची एसी लोकलची आकडेवारी

एप्रिल ते जून २०२२-२३

प्रवासी - २६.६० लाख

उत्पन्न - १२.१६ कोटी

एप्रिल ते जून २०२३-२४

प्रवासी - ४९.४७ लाख

उत्पन्न - २३.३६ कोटी रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com