

Harbour Line Chaos: AC Locals Missing, Schedule Collapses
esakal
-नितीन बिनेकर
मुंबई: ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात थंडगार प्रवासाचे स्वप्न दाखवणारी एसी लोकल सेवा प्रत्यक्षात मात्र प्रवाशांसाठी ‘गरम’ अनुभव ठरत आहे. हार्बर मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या कमी असतानाही त्या वारंवार विलंबाने धावत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. एसी लोकलच्या नावाने तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना शेवटी नॉन-एसी गाड्यांतूनच घामाघूम प्रवास करावा लागत असून, ही सेवा केवळ दिखाऊ ठरत असल्याची तीव्र टीका होत आहे.