
कल्याण : काल मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनचा मोठा अपघात घडला. लोकलने लटकत प्रवास करताना धक्का लागल्याने प्रवासी ट्रॅकमध्ये पडल्याच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आज प्रवाशांनी दरवाजा बंद होणाऱ्या एसी लोकलला पसंती दिली आहे. परंतु नेहमीची ८ .५९ ची एसी लोकल आज काही वेळ उशिराने दाखल झाल्यामुले रोजच्या पेक्षा आज डोंबिवली स्थानकात एसी लोकलला मोठी गर्दी झाल्याची माहिती मिळाली आहे.