पश्चिम रेल्वे मार्गावर 15 ऑक्टोबरपासून AC लोकल सुरु होणार

प्रशांत कांबळे
Wednesday, 14 October 2020

मुंबई लोकल या सर्वसामान्यांसाठी सुरु झालेल्या नाहीत. केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकृत QR कोड पास धारकांनाच ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.

मुंबई : राज्य शासनाच्या आदेशावरून सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 506 फेऱ्या धावत असून, राज्य शासनाच्या विनंतीवरून त्यात आणखी 194 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा  निर्णय घेतला आहे. त्यात 10 एसी लोकलचा देखील समावेश आहे. वाढीव फेऱ्या त्याचबरोबर AC लोकल सुरु करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

15 ऑक्टबर पासून  या सर्व वाढीव लोकल सुरू करण्यात येणार असून पश्चिम रेल्वेवर एकूण 700 लोकल फेऱ्या धावणार आहेत. 

महत्त्वाची बातमी : "राज्यपाल पदावर बसलेल्या व्यतीच्या वागण्यावर खेद वाटतो"; शरद पवारांचं थेट मोदींना पत्र

194 अतिरिक्त फेऱ्यांपैकी 51 फेऱ्या ह्या चर्चगेट ते विरार दरम्यान धावणार आहेत. तर 96 फेऱ्या बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणार आहेत. त्याप्रमाणे भाईंदर ते विरार दरम्यान 9 फेऱ्या, नालासोपारा ते चर्चगेट 12 फेऱ्या, चर्चगेट ते भाईंदरदरम्यान 9 फेऱ्या, वसई रोड ते चर्चगेटदरम्यान 2 फेऱ्या, वांद्रे ते बोरिवली दरम्यान 8 फेऱ्या आणि चर्चगेट ते वांद्रे दरम्यान 8 फेऱ्यांचा समावेश आहे. 

महत्त्वाची बातमी : अनिल परब यांना तातडीने लिलावतीमध्ये हलवलं, मुख्यमंत्र्यांनी रद्द केली मातोश्रीवरील बैठक

कमी फेऱ्यांमुळे लोकलमध्ये सामाजिक अंतर राखणे कठीण होत असल्याने राज्य सरकारने अतिरिक्त फेऱ्या वाढवून देण्याची विनंती पश्चिम रेल्वेला केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई लोकल या सर्वसामान्यांसाठी सुरु झालेल्या नाहीत. केवळ अत्यावश्यक सेवेतील अधिकृत QR कोड पास धारकांनाच ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.

ac trains will start running on western railways from 15th October


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ac trains will start running on western railways from 15th October