मोठी बातमी : वैद्यकीय पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र लवकरच सुरु होणार, वेळापत्रक होणार जाहीर...

तेजस वाघमारे
Wednesday, 22 July 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही शालेय शिक्षण विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू केले.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही शालेय शिक्षण विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू केले. मात्र उच्च शिक्षण आणि आरोग्य विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. अखेर विद्यार्थांची प्रतीक्षा संपुष्टात येणार असून वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक विद्यापीठ तयार करत असून ते लवकरच जाहीर होणार आहे.

मोठी बातमी मुंबईतील लोकल सेवा कधी सुरु होणार? यावर राजेश टोपे म्हणतात, नागरिकांची मागणी रास्त...

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (ता.21) आरोग्य विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्राबाबत विचारविनीमय व सवितस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरु करण्यात यावे. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शक्य नसल्यास ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने वर्ग घ्यावे, याबाबत विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना सूचीत करण्यात यावे असे निर्देश देशमुख यांनी दिले.

मोठी बातमी : कोरोनाने पोलिसांना देखील बदललं, वाचा नक्की झालंय तरी काय...

कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सष्ट केले आहे. माध्यमांना माहिती देताना मात्र विद्यापीठाने अद्याप नेमके कधी सत्र सुरु होणार हे स्पष्ट केलेले नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात लवकरच माहिती दिली जाईल असे सांगितले आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

academic session for undergraduate medical students will begin soon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: academic session for undergraduate medical students will begin soon