esakal | दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाणे जिल्ह्यात एक हजार वाहनांची विक्री 
sakal

बोलून बातमी शोधा

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाणे जिल्ह्यात एक हजार वाहनांची विक्री 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे ठप्प झाले. यात वाहन विक्रीचा वेगही कमालीचा मंदावला होता. महिनाभरात एकाही वाहनाची खरेदी न झाल्याचा विक्रमही याच लॉकडाऊन काळात झाला. मात्र, "मिशन बिगीन' अंतर्गत सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत होत असताना वाहन विक्रीनेही वेग घेतला. त्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रीने अधिक वेग घेत ठाणे जिल्ह्यात तब्बल एक हजार 84 वाहनांची विक्रीची नोंद केली. यामुळे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) सुमारे सव्वादोन कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाणे जिल्ह्यात एक हजार वाहनांची विक्री 

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे ठप्प झाले. यात वाहन विक्रीचा वेगही कमालीचा मंदावला होता. महिनाभरात एकाही वाहनाची खरेदी न झाल्याचा विक्रमही याच लॉकडाऊन काळात झाला. मात्र, "मिशन बिगीन' अंतर्गत सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत होत असताना वाहन विक्रीनेही वेग घेतला. त्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रीने अधिक वेग घेत ठाणे जिल्ह्यात तब्बल एक हजार 84 वाहनांची विक्रीची नोंद केली. यामुळे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) सुमारे सव्वादोन कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. 

अधिक वाचा : ठाणे जिल्ह्यात मागील आठ दिवसात रुग्णांच्या संख्येत घट

गुढीपाडवा, अक्षय तृतीय आणि दसरा या साडेतीन मुहूर्तांवर सोन्याचे दागिने व वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. यंदा कोरोना महामारीने मार्च महिन्यांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. परिणामी गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया या दोन्ही शुभमुहूर्तांवर वाहनांची विक्री ठप्पच होती. त्यामुळे मोठा आर्थिक फटका विक्रेत्यांना सहन करावा लागला.

वाहन विक्री बंद असल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचाही महसूल बुडाला होता. सरकारने ठप्प पडलेल्या राज्यातील उद्योगधंद्यांना गती मिळावी यासाठी टाळेबंदीत शिथिलता आणल्याने हळूहळू सर्व उद्योग, व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले. त्यात गेल्या सात महिन्यांपासून ठप्प असलेली वाहन विक्री दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा तेजीत आल्याचे दिसून आले. 

क्लिक करा : महाराष्ट्राचे मालक असल्यासारखे का वागताहेत, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगनाचं उत्तर

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला व दसऱ्याच्या मुहूर्तावर एक हजार 84 वाहन विक्रीची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक 826 दुचाकी, 256 कार आणि दोन वाहतूक वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या विक्रीतून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दोन कोटी 24 लाख 19 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

आरटीओ     वाहन विक्री        मिळालेला महसूल 
ठाणे                733            1 एक कोटी 39 लाख 73 हजार 684 
कल्याण           249            52 लाख 77 हजार 97 
नवी मुंबई         102             31 लाख 68 हजार 726 
एकूण               1, 084        2 कोटी 24 लाख 19 हजार 507 

-------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

loading image