महाडमध्ये अपघातात व्यावसायिक ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

महाड (बातमीदार) : महाड-रायगड मार्गाजवळील नाते खिंड येथे मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास एका डबक्‍यात कार कोसळल्याने झालेल्या अपघातात महाडमधील एक व्यावसायिक ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. 

महाड (बातमीदार) : महाड-रायगड मार्गाजवळील नाते खिंड येथे मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास एका डबक्‍यात कार कोसळल्याने झालेल्या अपघातात महाडमधील एक व्यावसायिक ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. 

महाडमधील व्यावसायिक नितीन मेहता (वय ५६), बांधकाम व्यावसायिक योगेश कळमकर (वय ३८) आणि महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस (वय ४९) हे मंगळवारी रात्री महाड-रायगड मार्गावरून लाडवलीच्या दिशेने जात होते. नाते खिंड येथे कार आली असता समोरील बाजूला अचानक रस्त्यावर जनावरे आल्याने चालक नितीन मेहता यांचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याखाली असलेल्या डबक्‍यात पलटी झाली. यात नितीन यांचा जागीच मृत्यू झाला, तर शैलेश आणि योगेश हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच शेजारील नागरिकांनी धाव घेऊन कारमधील सर्वांना बाहेर काढले.

महाडमधील एका खासगी रुग्णालयात या सर्वांना दाखल केले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. याबाबत महाड शहर पोलिस ठाण्यात योगेश रामचंद्र कळमकर यांनी फिर्याद दिली असून, मोटार अपघात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in Mahad, died Business Man