माळशेज घाटात टेम्पोला अपघात, सातजण गंभीर जखमी

मुरलीधर दळवी
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुरबाड (ठाणे) : माळशेज घाटात शुक्रवारी (ता. 27) पहाटे एका टेम्पोला अपघात झाल्याने आठ जण जखमी झाले. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असून जखमींमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.

कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटामधील नाणे घाटमार्गाजवळच्या वळणावर पहाटे साडेपाच वाचता टेम्पोला (क्र.- MH 16-20-5705) आपघात झाला. जखमींमध्ये पाच महिला व तीन पुरूषांचा समावेश असून हे सर्व चेंबुर येथील रहिवासी आहेेत. त्यापैकी सात जण गंभीर जखमी झाले आहेत.  

मिराबाई बळीद, शशीकला बळीद, कविता  बळीद, जया खंडागळे, सुषमा भोईर, भानुदास भोईर, विजय बळीद व सचिन अल्लाट अशी जखमींची नावे आहेत.  याबाबत टोकावडे  पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस अधिक तपास करत  आहेत. 

Web Title: accident at malshej ghat 7 injured