माळशेज घाटात अपघात, एक ठार, एक जखमी

नंदकिशोर मलबारी
सोमवार, 4 जून 2018

सरळगांव ता.ठाणे (बातमीदार- नंदकिशोर मलबारी) - कल्याण अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात आवळेची वाडी येथे झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. येथे गेल्या एक महिन्यापासून सूरू झालेली अपघाताची मालिका धांबण्यास तयार नाही. 

या अपघाता बद्दल मिळालेली माहिती अशी की, डोंबिवली व ठाणे येथील दोन तरूण आपल्या मोटरसायकलवर आंळेफाट्याकडे फिरण्यासाठी केले होते. हे दोघे ठाण्याकडे परत येत असताना माळसेज घाटात आवळेवाडी येथे कल्याण कडून नगर कडे चाललेल्या दुधाच्या टॅक्करने या मोटरसायकला जोरदार धडक दिली. यात सुमीत महाजन (वय 26 रा ठाणे) हा गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र ओंकार शिंदे (वय 28 रा डोबिवली) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

या घाटातून अवजड कंन्टेनर वाहातूक वाढली आहे. एकाच वेळी दोन, तीन कंन्टेनर लागोपाठ या घाटातून जात असताना छोट्या वाहानांना हे कंन्टेनर या ओरटेक करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. हे कंन्टेनर ओरटेक करत असताना समोरून भरधाव वेगात वाहान आल्यास हे वाहान चालक छोट्या वाहानाची पर्वा करत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 

Web Title: accident in malshej ghat, one dead