नवी मुंबईमध्ये "ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत पाम बीचवर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विशाल गणेश पाटील (वय 21) असे मृताचे नाव आहे. रविवारी पहाटे नेरूळजवळ हा अपघात झाला. कार मिनी टेम्पोवर धडकल्याने टेम्पोचालकही जखमी झाला आहे. कारचालक मद्यधुंद असल्याचे उघड झाले असून, नेरूळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यावर ड्रंक ऍण्ड ड्राइव्हसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हेमंत मिश्रा असे कारचालकाचे नाव आहे. तो मुंबईतील काळाचौकी भागात राहतो. मिश्रा हा शनिवारी रात्री कामानिमित्त सीबीडी येथे आला होता. मित्रांसोबत रात्री त्याने दारू पार्टी केली. रविवारी पहाटे तीनला भरधाव कारने पाम बीचमार्गे मुंबईकडे जात होता. कारने पाम बीच मार्गावरील वजराणी स्पोर्टस क्‍लब चौकात पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ही कार टेम्पोलाही धडकली. दुचाकीस्वार विशाल पाटील हा रस्त्याच्या बाजूच्या लोखंडी गार्डवर आपटून गंभीर जखमी झाला. काही वेळात त्याचा मृत्यू झाला.
Web Title: accident one death by drunk and drive crime

टॅग्स