मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून शिवीगाळ तसेच आक्षेपार्ह शब्द वापरत टीका करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

मुंबई - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून शिवीगाळ तसेच आक्षेपार्ह शब्द वापरत टीका करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून शिवीगाळ करणाऱ्या प्रदीप भालेकर नावाच्या व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट 12 ने अटक केली आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच प्रदीप भालेकर यांनी सोशल मीडियावर राज्यपालांवरही अपशब्दाचा वापर करत ट्विट केले आहे. आरोपीच्या ट्विटर हँडलवर अनेक वेगवेगळ्या राजकारण्यांविरोधात अपशब्दांचे वापर करत ट्विट केले गेल्याचे आढळून आले आहे.

एवढेच नाही तर पोलिसांनी प्रदीप भालेकर यांचा मोबाईलही जप्त केला आहे. प्रदीप भालेकर यांच्यावर मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपीला मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाकडून 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून पुढील तपास समतानगर पोलिस करत आहेत.