गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यास अटक

file photo
file photo

मुंबई : बोरिवली येथील सराफाच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास तब्बल दोन वर्षांनी अटक करण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष 12 च्या पोलिसांना यश आले. मनीष देवीलाल दर्जी (वय 32) असे आरोपीचे नाव असून, त्याने 1 कोटी 31 लाखांची चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. 
मनीष हा मूळचा राजस्थानचा आहे. त्याची एक टोळी असून, ही टोळी मुंबईतील सराफी दुकानांची टेहळणी करते. त्यानंतर या ठिकाणी टोळीतील एक सदस्य कामगार म्हणून लागतो. मालकाचा विश्‍वास बसल्यानंतर त्यांना गुंगीचे औषध देत दुकान लुटले जाते. मनीष हा बोरिवलीतील सराफी पेढीत नोकरीला लागला होता. काही दिवसांतच त्याच्यावर मालकाचा विश्‍वास बसला. मालक दुकानाच्या चाव्या मनीषकडे देत असे. मनीषने साबणाच्या वडीवर चावीचे छाप उमटवून बनावट चावी तयार करून घेतली. दरम्यान, मालक काही कामानिमित्त बाहेरगावी निघून गेला. मनीषने सराफाच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन दुकानातील एक कोटी 31 लाखांचा ऐवज लांबवला. सराफाच्या तक्रारीनुसार बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनीषच्या काही साथीदारांना अटक केली; मात्र मनीष फरारी होता. तो मालाड येथील डायमंड मार्केटजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com