सतत चिडवायचा म्हणून आवळला शेजारच्या मुलाचा गळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

घाटकोपरमधील घटना

मुंबई - घाटकोपर येथे 15 वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 68 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मृत मुलगा आरोपीला सतत चिडवत असल्यामुळे आरोपीने रागाच्या भरात त्याचा गळा आवळून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा - दुसऱ्या वर्षातच मासिक पाळी

शनिवारी (ता. 29) घाटकोपर पश्‍चिम येथील अल्ताफनगर येथे ही घटना घडली. शिव शंभु पवार (15) असे मृत मुलाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हिम्मत ग्यानी गोविंद (68) याला अटक केली आहे. 

हेही वाचा - हनिमूनला जाताय 'या' गोष्टी नक्की सोबत घेऊन जा...

शिव हा नेहमी गोविंद याला चिडवत असे. नेहमीच्या या चिडवण्यामुळे संतापलेल्या गोविंदने शनिवारी शिवला पकडून हाताने गळा दाबून त्याला मारून टाकले. घटनेनंतर शिव याला तत्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी गोविंदविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.  

web title : Accused arrested for murder of minor child

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused arrested for murder of minor child

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: