esakal |  तो तिला गोडबोलून घरी घेऊन जायचा आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

 तो तिला गोडबोलून घरी घेऊन जायचा आणि...

दररोज महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येतच आहेत.

 तो तिला गोडबोलून घरी घेऊन जायचा आणि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : दररोज महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येतच आहेत. ठाण्यात देखील अशीच एक अमानुष घटना समोर आली असून एका नराधमाने अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

हेही वाचा - ते आधी निर्जनस्थळी न्यायचे आणि मग...


अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणाला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली असून दीपेश सुतार (२२) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (ता.२१) वर्तकनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील लोकमान्यनगर, पाडा नंबर १ परिसरातून ही घटना समोर आली आहे. आरोपी दीपेशने पीडित पाच वर्षीय मुलीला गोड बोलून घरी नेले; तसेच घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हेही वाचा - इथे शाळांना मिळेनात शिक्षक

त्यानंतर पीडित मुलगी घरी आल्यावर आजारी पडल्याने तिच्या आईने उपचारासाठी तिला दवाखान्यात नेले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने दीपेश याचे नाव सांगितल्यावर सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर, याप्रकरणी मंगळवारी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून नराधम दीपेश याला अटक करण्यात आली.  

web title : The accused arrested for torturing little girl

loading image