पोलिसाच्या ताब्यातून आरोपी पळाला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

मुंबई - सत्र न्यायालयातून आर्थर रोड तुरुंगात नेत असताना गुरुवारी (ता.19) तुरुंगाबाहेर बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पळ काढला. हॅरियन जोसेफ अँथोनी (37) असे त्याचे नाव आहे. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तो अँटॉप हिल येथील कोकरी आगारातील ट्रान्झिट कॅंपमधील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईत तीन गुन्हे दाखल आहेत. 

अँथोनीला सत्र न्यायालयातील सुनावणी आटोपून आर्थर रोड तुरुंगात नेण्यात येत होते; तुरुंगाच्या दरवाजासमोरच पोलिस शिपाई गायकवाड यांच्या हाताला हिसका देऊन त्याने पळ काढला. गायकवाड यांनी त्याचा पाठलाग केला; पण वाहतूक कोंडीचा फायदा घेत तो पळून गेला. याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पकडण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे पोलिसही त्याचा शोध घेत आहेत. 

अँथोनीवर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याचा गुन्हा शिवडी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या मुलीशी त्याने नंतर लग्न केले होते. याशिवाय एमआरए मार्ग पोलिस ठाण्यातही त्याच्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. 

आरोपी पळाल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वीही एक आरोपी अशाच प्रकारे पळाला होता; परंतु त्याला पकडण्यात आले.

Web Title: The accused fled from the custody of the policeman