फोन करुन शिवसेनेच्या आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं | Shivsena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SEX-RACKET

फोन करुन शिवसेनेच्या आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: शिवसेना आमदाराला (Shivsena mla) सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्या (Sextoration racket) व्यक्तीस राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार आमदार यांना २० ऑक्टोबरच्या रात्री एक संदेश आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता.

तक्रारदाराने प्रतिसाद देताच पुढे दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. चँटद्वारे या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. त्यानुसार आमदार साहेबांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला. महिलेने सुमारे १५ सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली.

हेही वाचा: धक्कादायक! शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मताने पराभव

फोन कट होताच आमदारांच्या मोबाइलवर एक व्हिडिओ पाठवला. आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी आमदाराने मुंबईत पोलीस तक्रार दिली. त्यानंतर आरोपीचा भरतपूर येथे शोध लागला. भरतपूर येथील सिकारी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून पकडले. लवकरच या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.

loading image
go to top