esakal | मालाड: महिलेला टॉयलेटमध्ये डांबून लुटलं घर
sakal

बोलून बातमी शोधा

मालाड: महिलेला टॉयलेटमध्ये डांबून लुटलं घर

मालाड: महिलेला टॉयलेटमध्ये डांबून लुटलं घर

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मालाड (malad) मध्ये एकट्या वयोवृद्ध महिलेला घराच्या टॉयलेट मध्ये डांबून (lock in toilet) आरोपींनी लाखो रुपये लुटल्याची (loot) धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अनोळखी व्यक्ती दुपारच्या सुमारास वृद्ध महिला (old women) घरात एकटी असल्याचे पाहून घरात शिरले.

त्यानंतर त्यांनी ६० वर्षीय वृद्ध महिलेला टॉयलेटमध्ये डांबून घर लुटलं. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: पंजशीरवर तालाबिनाचा ताबा नाहीच; अमरुल्ला सालेह यांचा VIDEO समोर

महिलेच्या घरातून ४ लाखांचा ऐवज चोरांनी पळवला. मालाडच्या लोकमान्य टिळक वाचनालयामागे झकेरिया रोडवरील वसंत व्ह्यु इमारतीत महिला रहात होती.

loading image
go to top