आजी-आजोबांची हत्या करुन फरार आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यात राहणाऱ्या मुन्नवर गफारअली  हा आपल्या आजी-आजोबावर जीवघेणा हल्ला करून फरार झाला होता. 

ठाणे : उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यात राहणाऱ्या मुन्नवर गफारअली (25) हा आपल्या आजी-आजोबावर जीवघेणा हल्ला करून फरार झाला होता. 

दरम्यान आरोपी मुन्नवर हा मुंबई-ठाण्यात दबा धरून बसल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिस आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून आरोपी अली मुन्नवर याला ठाण्यातील सिडको बस स्टॉप येथे अटक केले. सबंधित माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यातील गोयन गावात राहणाऱ्या मुन्नवर गफारअली याने 4 आक्‍टोबर 2019 ला चुलत आजोबा दादा हुसैन (65) आणि शमिना (62) यांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली होती. ज्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान मुन्नवर याच्यावर अमेठी शिवरतगंज पोलिस ठाण्यात  दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused murderer arrested in mumbai