esakal | मतिमंद मुलीचे अपहरण करून, अतिप्रसंग करणारा आरोपी 24 तासात गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मतिमंद मुलीचे अपहरण करून, अतिप्रसंग करणारा आरोपी 24 तासात गजाआड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा :- 16 वर्षाच्या अल्पवयीन मतिमंद (Mentally retarded) मुलीला राहत्या घरातून, मोटारसायकल (Bike) वर जबरदस्तीने बसवून, अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना वसई (Vasai) च्या वालीव पोलीस ठाणे (Thane) हद्दीत उघड झाली आहे. घटनेची तक्रार दाखल होताच 31 वर्षाच्या वासनांध नाराधमाला विरार गुन्हे शाखा कक्ष 03 च्या पोलिसांनी (Police) अवघ्या 24 तासात अटक करण्यात यश मिळविले आहे. याबाबत वालीव (Valiv) पोलीस ठाण्यात (Thane) भादवी कलम 376 (2),(के),(एम), 366 (अ), सह बाल लैंगिक अधिकार संरक्षण कायदा अधिनियम 2012 चे कलम 4,6,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केल्या जात असून, वासनांध आरोपीला कडक शासन करावे अशी मागणी सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांकडून होत आहे.

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार ता 07 रोजी दुपारी 2 ते रात्री 11 या वेळेत अज्ञात इसमाने 16 वर्षाच्या अल्पवयीन मतिमंद मुलीला राहत्या घराच्या परिसरातून जबरदस्तीने मोटारसायकल वर बसवून, अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. याबाबतची तक्रार गुरुवार ता 09 रोजी वालीव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त महेश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा कक्ष 03 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते.

हेही वाचा: World Mental Health Day : सुख म्हणजे नक्की काय असतं ?

प्रमोद बडाख यांच्या पथकाने गुप्त बातमीदार च्या माध्यमातून नालासोपारा पूर्व संतोषभूवन परिसरातील अण्णाडीस कम्पाउंड, गावराईपाडा-हवाईपाडा येथून बिगारी काम करणाऱ्या 31 वर्षाच्या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या वासनांध नाराधमाला वालीव पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला अटक केले आहे.

loading image
go to top