Mumbai : मुंबईत बांगलादेशींविरोधात कारवाई तीव्र; 315 अटकेत...कारवाईत दुप्पटीने वाढ..

देशात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी मोहिम तीव्र केली
Mumbai
Mumbai esakal

मुंबई : देशात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत यावर्षी नोव्हेंबरपर्यंत मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य केलेल्या 315 बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईचा हा उच्चांक आहे. गेल्यावर्षी मुंबईत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 139 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. यावर्षी या संख्येत दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. रोजगारासाठी भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या अधिक आहे.

Mumbai
Travel Tips : ग्रुपसोबत ट्रीपला जाताना ‘या’ छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा

यावर्षात दुप्पटिने कारवाई

यावर्षी मुंबई पोलिसांनी बांगला देशी नागरिकांविरोधातील मोहिम तीव्र केल्यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतून 315 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे.गेल्यावर्षी मुंबईत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 139 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. यावर्षी या संख्येत दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. मुंबईत परदेशी नागरिकांसाठी स्थानबद्धता केंद्र बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी देण्यात आला आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात हद्दपार करण्यापूर्वी स्थानबद्ध करण्यासाठी स्थानबद्धता केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावीत असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच हे स्थानबद्धता केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.

Mumbai
Career Tips : वारंवार सर्च करूनही जॉब मिळत नाही? मग,'या' स्ट्रॅटेजीचा करा वापर

महत्त्वाच्या पोलीस कारवाया

बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्र तयार करण्यात मदत करणारा दलाल सलमान अयुब खान या आरोपीने मुंबई शहरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांना अवैध मार्गाने आणले होते. सर्व बांगलादेशी नागरिकांना खानने बनावट पारपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अजून महत्त्वाची कागदपत्रे बनवून दिली होती.ही बोरीवली पोलिसांनी जप्त केली आहेत. बांगलादेशी नागरिकांविरोधात ही या वर्षांतील सर्वात मोठी कारवाई होती. त्यानंतरही सातत्याने कारवाया सुरू आहेत. नुकतीच अवघ्या वीस हजारात अनधिकृतपणे बांगलादेशातून भारतात येण्यासाठी नागरिकांना मदत करणारी टोळीही पोलिसांनी पकडली.

Mumbai
Baby Care Tips : हिवाळ्यात बाळाची मालिश करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर, बाळ राहील तंदूरूस्त

दलालांवर लगाम

मुंबई पोलिसांनी यावर्षी बांगलादेशी नागरिकांविरोधात केलेल्या कारवाईत बहुसंख्य बांगलादेशी नागरिकांनी बनावट आधारकार्ड व पारपत्र बनवल्याचे आढळून आले आहे. बोरीवली पोलिसांनी केलेल्या कारवाईत सलमान नावाचा दलाल अशी कागदपत्रे तयार करून देत होता. अशा बनावट कागदपत्रांमुळे अनेक बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करताना अडचणी येतात. त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या दलालांना पकडण्याला पोलीस प्राधान्य देत आहे. याबाबत स्थानिक पोलिसांचे दहशतवाद विरोधी कक्ष, गुन्हे शाखा व राज्याचे दहशतवाद विरोधी पथक संयुक्तपणे काम करत आहेत.

"बेकायदेशीरित्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात सातत्याने कारवाया सुरू आहेत. नुकतीच 20000 अनधिकृतपणे बांगलादेशातून भारतात येण्यासाठी नागरिकांना मदत करणारी टोळीही पोलिसांनी पकडली. या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंतच बांगलादेशी नागरिकांविरोधातील मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे"

-सत्य नारायण चौधरी , सहपोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) ,मुंबई पोलीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com