esakal | डिसेंबरअखेर घोटाळेबाजांवर कारवाई : किरीट सोमय्या
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डिसेंबरअखेर घोटाळेबाजांवर कारवाई : किरीट सोमय्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : महाविकास आघाडी या 'अलिबाबा' सरकारमधील चाळीस चोरांना लवकरच तुरुंगात पाठवू. सरकारने अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि परमबीर सिंग (Parambir Singh) कुठे लपवून ठेवले आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे.

देशमुख तुरुंगात जातील तेव्हा सर्वांची झोप उडालेली असेल, असे आव्हान देत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरपर्यंत २७ घोटाळ्यांचा तपास होऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे भाकित वर्तवले. भाजप कार्यकत्यांशी संवाद साधण्यासाठी सोमय्या रविवारी ठाण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, की राज्य सरकार माझे फोनवरील (टॅप) संवाद चोरून ऐकत आहे. तशी चित्रफीत व्हायरल झाली आहे.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार'

आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या घोटाळ्यांची माहिती मला कोणी दिली, हे महत्त्वाचे नाही; मात्र घोटाळ्यांची माहिती खरी आहे. घोटाळा उघड होत असेल, तर त्यासंदर्भात ठाकरे सरकार ढिलाई का दाखवत आहे, असा सवाल करतानाच माझ्याकडे असलेली एकही माहिती चुकीची नाही, असा दावा सोमय्या यांनी या वेळी पत्रकार परिषदेत केला

loading image
go to top