नवी मुंबईत फेरीवाल्यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

बेलापूर - नवी मुंबईतील पदपथ आणि रस्त्याकडेच्या सुमारे ९०० फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली. फेरीवाल्यांनी रस्त्यांचा बराचसा भाग काबीज केला होता. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत होती आणि वाहतुकीत अडथळे येत होते. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे बेकायदा फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे. 

तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्यामुळे शहरातील पदपथ आणि रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला होता; परंतु त्यांच्या बदलीनंतर शहरातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांनी पुन्हा काबीज केले होते; परंतु महापालिकेने पुन्हा केलेल्या कारवाईमुळे फेरीवाले धास्तावले आहेत. नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या सर्वच विभागांतील सुमारे ९०० हून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यांचे सामानही महापालिकेने जप्त केले आहे. शहरातील बेकायदा फेरीवाल्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. रहदारीतही अडथळे येतात. त्यामुळे महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई केली. पुढील काळातही ही कारवाई सुरूच राहील. तशा सूचना विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना दिल्या आहेत, असे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Action on howkers in Navi Mumbai