Crime News : ३४ लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक

डोंगरी येथे वांद्रे अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
action of Bandra Anti-Narcotics Squad Two arrested MD drugs Rs 34 lakh crime mumbai
action of Bandra Anti-Narcotics Squad Two arrested MD drugs Rs 34 lakh crime mumbaisakal

अंधेरी - सुमारे ३४ लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसहीत दोघांना वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंगरी परिसरातून अटक केली. कुर्बान आणि अख्तर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी १७० ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुधवारी रात्री वांद्रे युनिटचे काही अधिकारी आणि कर्मचारी डोंगरी परिसरात गस्त घालत होते. यावेळी या पथकाला दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अंगझडती घेण्यत आली होती. त्यात या अधिकार्‍यांना १७० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे ३४ लाख रुपये आहे.

ड्रग्ज बाळगणे आणि त्याची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध नंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले, ते कोणाला विक्री करण्यासाठी आले होते, त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली अहो का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com