कर थकबाकीदारांवर बडगा

कर थकबाकीदारांवर बडगा

मुंबई  - महापालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या विरोधात करनिर्धारण आणि संकलन खात्याने धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने महिनाभरात २७ मालमत्तांवर कारवाई केली असून, १४ कोटी ६२ लाखांची थकबाकी असलेल्या पाच मालमत्तांचा जाहीर लिलाव केला. प्रशासनाने १३ मालमत्तांवर अटकावणीची आणि नऊ मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्याची कारवाई केली आहे. 

मालमत्ता कर थकवल्याबद्दल लिलाव केलेल्या बहुतेक मालमत्ता अंधेरी पश्‍चिम विभागातील आहेत. सुमारे ३० कोटी ५० लाखांपेक्षा अधिक कर थकवणाऱ्या नऊ मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली. त्याचप्रमाणे ३७ कोटी ३८ लाखांहून जास्त कर थकवणाऱ्या १३ मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. त्यात निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, खुली जागा, सरकारी, शैक्षणिक आदी वर्गांतील थकबाकीदार मालमत्तांचा समावेश आहे. कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कराचा मुदतीत भरणा करा. देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत भरणा करा, असे आवाहन करनिर्धारण व संकलन खात्याने केले आहे.

लिलाव केलेल्या मालमत्तांची थकबाकी 
दोन व्यावसायिक इमारती - ८ कोटी ५२ लाख ७३ हजार रु.
तीन भूखंड - ६ कोटी ९ लाख ८१ हजार ५९३ रुपये

जलजोडणी खंडित केलेल्या मालमत्ता 
ग्रॅण्टरोड - २, एल्फिन्स्टन - १,  वांद्रे पश्‍चिम - १, अंधेरी पश्‍चिम - २, बोरिवली पश्‍चिम - १ आणि भांडुप - १ 
एकूण थकबाकी - ३० कोटी ५० लाख ९४ हजार रु.

जप्त केलेल्या मालमत्ता 
ग्रॅण्ट रोड - २, दादर पश्‍चिम - १, वांद्रे पूर्व - २, अंधेरी पूर्व - २, गोरेगाव पश्‍चिम - २, बोरिवली पश्‍चिम - ३ आणि भांडुप - २ 
एकूण थकबाकी - ३७ कोटी ३८ लाख ८४ हजार रु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com