
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावर गर्दीच्या ठिकाणी विनामास्क प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे, लोकल प्रवास करत असल्यास कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावर गर्दीच्या ठिकाणी विनामास्क प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे, लोकल प्रवास करत असल्यास कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत. मात्र तरीही विनामास्क प्रवाशांचा रेल्वे मार्गावर मुक्तसंचार दिसत असल्याने लोहमार्ग पोलिसांनी अशा प्रवाशांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी (ता.27) 47 प्रवाशांवर कारवाई केली असून, एकूण 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.
हेही वाचा - सायन रूग्णालय परिसरात गॅस गळती; सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकल गाड्या, रेल्वे स्थानक, फलाटावर विनामास्क फिरणारे प्रवासी, महापालिका, नगरपालिका, राज्य सरकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या एक महिन्यात 125 प्रवाशांपेक्षा जास्त प्रवाशांवर कारवाई केली असून, 25 हजारांपेक्षा जास्त दंड वसुली लोहमार्ग पोलिसांनी केली आहे. गुरुवारी विनामास्क मोहिमेअंतर्गत एकाच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकावर 47 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या सर्वांकडून प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 10 हजार रुपयांची एकूण दंड वसुली केली असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. यापुढेही विनामास्क मुक्तसंचार करणाऱ्या प्रवाशांवर वेळोवेळी कारवाई सुरूच राहणार असल्याने, प्रवाशांनी मास्क लावावे, सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन सुद्धा लोहमार्ग पोलिसांनी केला आहे.
हेही वाचा - पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत! चक्रीवादळात तडाख्यानंतर सरकारचे दुर्लक्ष
या स्थानकांवर शून्य कारवाई
दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, वडाळा, वाशी, पनवेल, चर्चगेट, वांद्रे, वसई रोड, पालघर या स्थानकावर गुरुवारी (ता.26) एकही कारवाई झाली नाही.
स्थानक कारवाई केलेले नागरिक दंडात्मक रक्कम
सीएसएमटी 7 1400
कुर्ला 11 2200
डोंबिवली 2 1000
मुंबई सेंट्रल 12 2400
अंधेरी 12 2400
बोरिवली 3 600
एकूण 47 10000
Action on unmasked passengers Railway police crackdown
----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )