आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई - सहारिया 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई - आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिला. मुंबई महापालिका निवडणूक व्यवस्थेचा आढावा सहारिया यांनी घेतला. 

मुंबई - आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिला. मुंबई महापालिका निवडणूक व्यवस्थेचा आढावा सहारिया यांनी घेतला. 

राज्य निवडणूक आयोगाने नेमलेले मुख्य निवडणूक निरीक्षक यू. पी. एस. मदान, पालिका आयुक्‍त अजोय मेहता, सहपोलिस आयुक्‍त देवेन भारती या वेळी उपस्थित होते. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल. मतदारांना प्रलोभन दाखवले किंवा त्यांच्यावर दबाब टाकला जात असल्याची तक्रार आल्यास कठोर कारवाई केली जाईल. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तसा आदेश दिल्याचे सहारिया यांनी सांगितले. मतदान व मतमोजणीची सर्व माहिती ही संगणकाद्वारेच मिळावी आणि ही माहिती द्यायला उशीर होणार नाही, याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. 

Web Title: action is a violation of the Code of Conduct