esakal | धावत्या लोकलवर फुगे फेकल्यास होणार कारवाई!
sakal

बोलून बातमी शोधा

धावत्या लोकलवर फुगे फेकल्यास होणार कारवाई!

धावत्या लोकलमध्ये रंगाचे आणि पाण्याचे फुगे धूलिवंदनच्या दिवशी एकमेकांवर फेकले जातात. त्यावर रोक लावण्यासाठी ठिकठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाला तैनात करण्यात येणार आहे.

धावत्या लोकलवर फुगे फेकल्यास होणार कारवाई!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धावत्या लोकलमध्ये रंगाचे आणि पाण्याचे फुगे धूलिवंदनच्या दिवशी एकमेकांवर फेकले जातात. त्यावर रोक लावण्यासाठी ठिकठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाला तैनात करण्यात येणार आहे. त्यासह, जनजागृती कार्यक्रम, रेल्वे रुळाशेजारी सुरक्षा वाढविणे, रेल्वे रुळालगत होळी न पेटवणे अशा उपाययोजना करण्याचा प्रयत्न मध्य आणि पश्‍चिम रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

ही बातमी वाचली का? मुंबईत भूखंड खरेदी करताय? हे आहे नवे धोरण...

पश्‍चिम रेल्वे मार्गावरील माहीम, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, विरार, मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, सायन, घाटकोपर, ठाणे आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द, वडाळा या स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने फौजफाटा वाढविण्यात येणार आहे. धावत्या लोकलवर फुगे मारताना कोणी दिसल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

ही बातमी वाचली का? पालघरमध्ये अवकाळी पाऊस

मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टी वस्त्यांमध्ये जनजागृती रॅली काढण्यात येते. रेल्वे रुळालगत होळी न पेटवण्यासाठी जनजागृती केली जात आहे. 
- अश्रफ के. के., वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे.

लोकलवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- विनीत खरब, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, पश्‍चिम रेल्वे.