पालघरमध्ये अवकाळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 मार्च 2020

पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाले. सफाळे येथे पावसामुळे एका स्कूल व्हॅनचा अपघात झाल्याची घटना घडली; तर पालघरच्या आठवडी बाजारात दुकानदारांची एकच तारांबळ उडाली.

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाले. सफाळे येथे पावसामुळे एका स्कूल व्हॅनचा अपघात झाल्याची घटना घडली; तर पालघरच्या आठवडी बाजारात दुकानदारांची एकच तारांबळ उडाली.

ही बातमी वाचली का? पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटीलांना दिलासा

पालघर-माहीम रस्त्याच्या दुतर्फा कपडेविक्रेते, मच्छीविक्रेते, भाजीविक्रेत्यांनी दुकाने मांडली होती. दरम्यान, सकाळच्या वेळी अचानक आकाश ढगांनी भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. साधारणतः पंधरा मिनिटे पाऊस बरसला; मात्र अचानकपणे पाऊस बरसल्याने बाजारातील कपडेविक्रेते, मच्छीविक्रेते, किराणा विक्रेते; तसेच भाजीपाला विक्रेत्यांच्या मालाचे नुकसान झाले. 

ही बातमी वाचली का? ठाण्यातील ...या गृहनिर्माण प्रकल्पात पुन्हा अडथळा?

दरम्यान, सफाळ्यातील माकुणसार येथे अवकाळी पावसाने रामबाग येथील रस्ता निसरडा झाल्याने एक स्कूल व्हॅन वडाच्या झाडाला धडकल्याने अपघात झाला. सुदैवाने गाडीत विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, पावसाला पहाटेपासून सुरुवात झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरीदेखील हवालदिल झाले. शेतीच्या नुकसानीची आकडेवारी हाती आली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unseasonal rain in palghar district