प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

मुंबई - आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान (८३) यांचे निधन झाले आहे.

मुंबई - आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान (८३) यांचे निधन झाले आहे.

अनेक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठी प्रधान यांनी अनेक बालनाट्ये, नाटके केली. चित्रपट, जाहीराती, मराठी तसेच इंग्रजी रंगभूमीवर वेगवेगळया भूमिकांमधून त्यांनी आपली छाप पाडली. आत्माराम भेंडे यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ आणि ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ अशी अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले.

महेश मांजरेकर दिग्दर्शित लालबाग परळ, शिक्षणाचा आयचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. लगे रहो मुन्नाभाई, जब वुई मेट या हिंदी सिनेमातही त्यांनी अभिनय केला.

Web Title: actor kishor pradhan pass away