मोदीविरोधात बोलल्यामुळे बॉलिवूडची माझ्याकडे पाठ: प्रकाशराज

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

मला गप्प करण्याचा प्रयत्न 
​"गौरी लंकेश यांच्या हत्येमुळे मला खूप वाईट वाटले. त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले, म्हणून त्यांना ठार मारण्यात आले. या लढ्यात त्यांना आपण एकटेच सोडले का? या प्रश्‍नाने त्या वेळी माझ्या मनात अपराध्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे मी प्रश्‍न विचारण्यास सुरवात केली, तेव्हा मलाही धमकी देऊन किंवा माझे काम थांबवून गप्प करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व भाजपच करत आहे,'' असा थेट आरोप प्रकाशराज यांनी या मुलाखतीत केला आहे. 

मुंबई : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध बोलू लागल्यापासून बॉलिवूडकडून एकाही चित्रपटाची ऑफर आली नाही, असा आरोप अभिनेते प्रकाशराज यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रकाशराज यांनी हे वक्तव्य केले आहे. 

हिंदी आणि दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयाने छाप पाडणाऱ्या प्रकाशराज यांनी भाजपविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, ""ऑक्‍टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलल्यानंतर बॉलिवूडने मला हद्दपारच केले आहे. दक्षिणेकडे कोणतीही समस्या नाही; मात्र बॉलिवूडकडून ऑफर येणे बंद झाले आहे.'' गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाशराज यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मौनावर सवाल केला होता. 

प्रकाशराज सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपविरोधात प्रचार करत आहेत. ते रोहित शेट्टीच्या "गोलमाल अगेन' या चित्रपटात शेवटचे दिसले होते. 

मला गप्प करण्याचा प्रयत्न 
"गौरी लंकेश यांच्या हत्येमुळे मला खूप वाईट वाटले. त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले, म्हणून त्यांना ठार मारण्यात आले. या लढ्यात त्यांना आपण एकटेच सोडले का? या प्रश्‍नाने त्या वेळी माझ्या मनात अपराध्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे मी प्रश्‍न विचारण्यास सुरवात केली, तेव्हा मलाही धमकी देऊन किंवा माझे काम थांबवून गप्प करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व भाजपच करत आहे,'' असा थेट आरोप प्रकाशराज यांनी या मुलाखतीत केला आहे. 

Web Title: actor Prakash Raj criticize Narendra Modi and BJP