'मोदीजी, हे मुस्लिम मला दिवाळी साजरी करू देत नाहीत'; अभिनेत्याचे ट्विट!

टीम ई-सकाळ
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

भानू हे मुंबईतील मलाड मालवनी या भागात राहत असून गेल्या वर्षीही मुस्लीम शेजाऱ्यांनी त्यांना दिवाळी साजरी करू दिली नव्हती.

मुंबई : ''मोदीजी, हे मुस्लीम शेजारी दिवाळी साजरी करू देत नाहीत. माझ्या पत्नीला दिवे लावण्यास मनाई केली आहे. तसेच दारात काढलेली रांगोळीही पुसायला लावली. त्यांनी लाईटचे दिवे फोडले अन वायरही तोडली आहे. मला सगळी लाईट काढण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती केली,'' असा आरोप करणारी एक पोस्ट अभिनेता विश्वास भानूने केली आहे.

- मनसेच्या रुपाली पाटील बारामतीत; घेतली पवारांची भेट

अभिनेता भानू हे मूळचे पाटणा येथील असून सध्या कामानिमित्त ते मुंबईत वास्तव्यास आहेत. मुस्लीम शेजाऱ्यांमुळे मला दिवाळी साजरी करता येत नसल्याची खंत त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. 

- अंड खायला न मिळाल्याने तिने सोडले पतीला अन् पळाली...

भानू हे मुंबईतील मलाड मालवनी या भागात राहत असून गेल्या वर्षीही मुस्लीम शेजाऱ्यांनी त्यांना दिवाळी साजरी करू दिली नव्हती. आता या वर्षीही त्यांना दिवाळी साजरी करण्याबाबत त्यांना मनाई केली जात आहे. त्यामुळे भानू यांना राग अनावर झाला आहे. त्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच टॅग करत आपला संताप ट्विटद्वारे व्यक्त केला आहे.  

- शिवसेना, भाजप घेणार राज्यपालांची स्वतंत्र भेट; काय असेल?

भानू यांची या पोस्टला 1600 जणांनी रिट्विट केलं असून फेसबूकवरील पोस्ट 2100 जणांनी त्यांची पोस्ट शेअर केली आहे. त्यावर 1600 हून अधिक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. भानू यांनी स्पेशल 26, मर्दानी, मांझी आणि ‘रघु रेमो’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor vishwa bhanu post viral on social media about muslim neighbors did not allowing him to celebrate diwali