

Famous director blackmails actress
ESakal
मुंबई : मुंबईत विरार परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रसिद्ध डायरेक्टरने चित्रपट आणि वेब सिरिजमध्ये काम मिळवून देण्याचे अमिष दाखवत जवळीक साधून फसवणूक केल्याप्रकरणी एका अभिनेत्रीने स्वतःच जीवन संपवलं आहे. तसेच अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून अभिनेत्रीला ब्लॅकमेल केल्यामुळे त्रासला कंटाळून अभिनेत्रीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.