ज्येष्ठ अभिनेत्री मंजू सिंह यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने निधन
actress Manju Singh
actress Manju Singhsakal

मुंबई : ऋषिकेश मुखर्जी यांच्या गोलमाल या चित्रपटात रत्नाची भूमिका साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मंजू सिंह यांचं गुरुवारी (ता 14)  मुंबईत निधन झाले.  त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.

स्वानंद किरकिरे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मंजू सिंहजी आता राहिल्या नाहीत! दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले! डीडीसाठी त्यांनी 'एक कहानी', 'शो टाइम' इत्यादी अनेक अप्रतिम शो केले होते. ऋषीकेश मुखर्जीच्या

'गोलमाल' चित्रपटातील रत्ना हमारी प्यारी मंजू जी, तुमचं प्रेम कसे विसरता येईल.. गुडबाय!'

मंजू सिंह अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांच्या योगदानामुळे खूप चर्चेत होत्या. 2015 मध्ये त्यांना भारत सरकारने केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नामांकित केले होते.

मंजू सिंह यांनी 'स्वराज', 'एक कहानी', 'शो टाइम' सारखे उल्लेखनीय शो तयार केले. लोक त्यांना प्रेमाने 'दीदी' म्हणायचे. त्या 'खेल खिलाडी' या मुलांच्या शोच्या अँकर देखील होत्या. या शोमध्ये त्यांनी सात वर्षे काम केले होते. हृषिकेश मुखर्जी यांच्या 'गोलमाल' चित्रपटात त्यांनी रत्नाची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका त्यांची प्रचंड गाजली.

अलीकडच्या काळात मंजू सिंह लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठीच्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांशी संबंधित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com