नेपाळी अभिनेत्रीच्या हत्येप्रकरणी दोघे दोषी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - नेपाळी अभिनेत्री मीनाक्षी थापा हिची मुंबईहून अपहरण करून उत्तर प्रदेशात हत्या करणाऱ्या दोघांना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून, उद्या सकाळी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. अमितकुमार जयस्वाल आणि त्याची प्रेयसी प्रिती सुरीन हे दोघे आरोपी आहेत. अमितकुमार हा पूर्वी वकिली करायचा आणि नंतर चित्रपटात सहकलाकार म्हणून काम करू लागला होता. 

डेहराडून येथील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मीनाक्षी थापा हिला चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी ती मुंबईत आली होती. मधुर भांडारकर यांच्या "हिरोईन' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी मीनाक्षीची अमितकुमार जयस्वाल आणि प्रिती सुरीन यांच्यासोबत ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यानंतर भोजपुरी चित्रपटात काम मिळत असल्याचे सांगून मीनाक्षीला या दोघांनी 13 मार्च 2012 रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे नेले; परंतु तेथे गेल्यानंतर अमितकुमार आणि प्रितीने आपले खरे रूप दाखविले. मीनाक्षीचे अपहरण केल्याची धमकी देऊन तिच्या आई-वडिलांकडे 15 लाख रुपयांची मागणी केली. तिच्या घरच्यांनी 60 हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. मीनाक्षी ही श्रीमंत कुटुंबातील असल्याचे आरोपींना वाटले होते; परंतु तिचे वडील ओएनजीसीमध्ये नोकरी करत होते. आता पैसे जास्त मिळणार नाहीत म्हणून या दोघांनी मीनाक्षीची हत्या करून तिचा मृतदेह एका निर्जनस्थळी टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी दोघांना कलम 302, 120 ब, 304 अ , 201 आणि आयटी कायद्याखाली अटक केली होती. बुधवारी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांनी अमितकुमार आणि प्रितीला दोषी ठरविले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पोलिसांची बाजू न्यायालयात मांडली. 

Web Title: Actress Meenakshi Thapa murder case Amit Jaiswal, Preeti Surin found guilty