अभिनेत्रीला मोबाईलवरून बलात्काराची धमकी 

अभिनेत्रीला मोबाईलवरून बलात्काराची धमकी 

मुंबई - टीव्ही मालिकांत काम करणाऱ्या 26 वर्षीय अभिनेत्रीला अनेक वेळा दूरध्वनी करून बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

कुटुंबीयांसह मालाडला राहणाऱ्या या अभिनेत्रीला 5 जूनला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्‌सऍप संदेश आला. तिने हा अनोळखी मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर त्याच क्रमांकावरून या अभिनेत्रीला अनेक मिस्ड कॉल आले. कोणाचा क्रमांक आहे, हे जाणून घेण्यासाठी तिने या मोबाईलवर दूरध्वनी केला. "मी तुझा प्रेमी आहे. मित्रांसह तुझ्या घरी येऊन बलात्कार करणार आहे', अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे घाबरलेल्या या अभिनेत्रीने मोबाईल बंद केला. 

त्यानंतर तिला याच क्रमांकावरून अनेक कॉल आले. आपल्याला पुन्हा कॉल करू नये, अशी विनंती तिने केली. त्यानंतर तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच क्रमांकावरून आलेला कॉल तिच्या वडिलांनी घेतला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे शनिवारी या अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार केली. 

त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधानातील क्र. 509 (महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलणे) व 504 (चारित्र्यहनन करणे) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात आरोपी या अभिनेत्रीच्या ओळखीचाच वाटत असून, तिने कोणावरही संशय व्यक्त केला नसल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com