अभिनेत्री शौकत आझमी यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई ः शौकत कैफी-आझमी यांच्या अंत्यसंस्कारावेळी शबाना आझमी यांचे सांत्वन करताना नातेवाईक. 
मुंबई ः शौकत कैफी-आझमी यांच्या अंत्यसंस्कारावेळी शबाना आझमी यांचे सांत्वन करताना नातेवाईक. 

मुंबई : अभिनेत्री शबाना आझमी यांच्या आई प्रसिद्ध थिएटर अभिनेत्री शौकत कैफी-आझमी (९३) यांचे शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी जुहू येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. २३) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शबाना आझमी यांच्या आई असलेल्या शौकत कैफी-आझमी यांच्या निधनाची माहिती जावेद अख्तर यांनी दिली. या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार मंडळी उपस्थित होती. शौकत कैफी-आझमी यांनी ‘उमराव जान’ (१९८१), ‘बाजार’ (१९८२), ‘गरम हवा’ (१९७४), ‘सलाम बॉम्बे’ (१९८८) यांसारख्या हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साथिया’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता; मात्र त्यानंतर त्या त्यांच्या घरीच होत्या. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे शौकत यांना कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com