अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

हृदयविकार बळावल्याने ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा (72) यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सिन्हा अनेक वर्षांपासून हृदयविकार, फुप्फुसांच्या आजारामुळे त्रस्त आहेत.

मुंबई - हृदयविकार बळावल्याने ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा (72) यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सिन्हा अनेक वर्षांपासून हृदयविकार, फुप्फुसांच्या आजारामुळे त्रस्त आहेत. सिन्हा यांनी "छोटी सी बात', "रजनीगंधा', "पती, पत्नी और वो' आदी चित्रपटांत काम केले आहे. "काव्यांजली', "कबूल है', "चंद्र नंदिनी', "कुल्फी कुमार बाजेवाला' यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. काही वर्षे त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. बऱ्याच वर्षांनी अभिनेता सलमान खानच्या "बॉडीगार्ड' चित्रपटामध्ये त्यांची झलक पाहायला मिळाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Vidya Sinha Sickness Healthcare